Posts

अक्कलकुवा मध्ये कालीमाता उत्सववाला प्रारंभ

Image
अक्कलकुवा : साधारण १०० वर्षांची परंपरा लाभलेल्या कालिका मातेच्या यात्रोत्सवाला यंदाही मोठ्या थाटात सुरुवात झाली. माघ शुद्ध पौर्णिमानिमित्त बुधवारी भाविकांच्या प्रचंड गर्दीत यात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी नवस फेडणायांसह देवीचे दर्शन व ओटी भरण्यासाठी महिलांची रीघ लागली होती. दुर्गम व अतिदुर्गम भागासह गुजरात राज्यातून भाविकांची हजेरी लागत असल्याने गेल्या चार दिवसांपूर्वीपासून व्यापायांनी व्यवसाय थाटण्यास सुरुवात केली होती. यात्रोत्सवात सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणारया सुप्रसिद्ध वैलबाजारात यंदाही बैलांची आवक होण्यास प्रारंभ झाला असून सायंकाळपर्यंत ७०० बैलांची आवक झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्ष व्यवहारांना गुरुयारी सकाळपासून सुरुवात होणार आहे. मनोरंजनाची साधने, खेळणी, खाद्यपदार्थ, मसाले, गृहोपयोगी साधने, कपड़े, चांदीचे दागिने यासोबतच याठिकाणी विविध शेतीची औजारे विक्रेतेही उपस्थित